बोनकोडे येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बैठक

  • Admin
  • नवी मुंबई
  • Oct 25, 2024

नवी मुंबई ।आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, खैरणे-बोनकोडे येथील नागरिकांसोबत संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विस्तृत चर्चा देखील पार पडली.

या चर्चासत्रात माजी नगरसेवक मुनावर पटेल, लीलाधर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक, तसेच समाजसेविका वैष्णवी नाईक यांची उपस्थिती होती. स्थानिक समस्यांचे निराकरण आणि निवडणुकीच्या आधी मतदारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.