
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई । 150, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( आठवले गट ) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक हे आपला नामांकन अर्ज उद्या सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल करणार आहेत.
लोकनेते गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. ऐरोली सेक्टर 4 येथील दत्तगुरु मंदिराजवळ, महापालिकेच्या स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदान येथे महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारसंघातील नागरिक सकाळी 9:30 वाजता एकत्र जमणार आहेत. यानंतर भव्य मिरवणुकीने महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते गणेश नाईक उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
लोकनेते गणेश नाईक यांनी विकसित आणि सुरक्षित नवी मुंबई घडवली. माणुसकीची विचारधारा जपत लोकसेवेचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला आहे. नवी मुंबईचा विकास असाच निरंतर पुढे ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लोकनेते गणेश नाईक यांना विक्रमी मताधिक्याने ऐरोली विधानसभा क्षेत्रातून जिंकून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.