जनतेच्या प्रचंड उपस्थितीत लोकनेते गणेश नाईक यांनी भरला उमेदवारी अर्ज
- Admin
- ठाणे
- Oct 28, 2024
नवी मुंबई ।जनतेच्या प्रचंड उपस्थितीमध्ये वाजत गाजत महायुतीचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ऐरोलीच्या सेक्टरच्या 4 स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदान येथून नामांकन अर्ज मिरवणूक रॅली निघाली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय ( आठवले ) आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी(अजीत पवार) जिला अध्यक्ष नामदेव भगत, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आमदार रमेश पाटील, आरपीआयचे सिद्राम ओव्हाळ, महेश खरे, युवा नेते संकल्प नाईक महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सर्व समाजाचे प्रांताचे आणि सर्वसामान्य नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. वाजत गाजत सर्व पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी लोकनेते गणेश नाईक यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. फटाके फोडण्यात आले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. नवी मुंबईला विकसित आणि सुरक्षित ठेवणारे नेतृत्व आमदार पदी कायम राहावे, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केल्या. जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादात ही रॅली सरस्वती विद्यालय येथे पोहोचली. या ठिकाणी लोकनेते गणेश नाईक यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. 1990 पासून जनतेच्या विश्वासावर आपण आमदार म्हणून जिंकून येत आहे. या निवडणुकीतही जनतेच्या आशीर्वाद आणि पाठबळ मिळेल असा विश्वास, लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईच्या विकासाला गती देऊन तो पुढे न्यायचा आहे, असा निर्धार व्यक्त करून महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने महायुतीच्या विजयासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.