
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाच वेळा नगरसेवक आणि मनपात विरोधी पक्षनेते राहिलेले रवि राजा आज शेकडो समर्थकांसह भाजपात दाखल झाले. सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने ते काँग्रेसवर नाराज होते.
रवि राजा गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि पक्षासाठी काम करत होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या राजकीय अनुभवाचा सन्मान म्हणून मुंबई भाजपने त्यांना उपाध्यक्षपदी निवड दिली आहे.रवि राजांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, तर भाजपासाठी हा एक महत्त्वाचा राजकीय लाभ ठरला आहे.