
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई। विक्रोळी पोलिस ठाण्यात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात आक्षेपार्ह विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. सुवर्णा सहदेव करंजे (वय 67), निवासी कांजूरमार्ग पूर्व, विक्रोळी, यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा गु.र.क्र. 588/2024 अंतर्गत कलम 79, 351(2), 356(2) बी एन.एस. नुसार दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात आरोपीने निवडणुकीच्या प्रचार सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून अपमानास्पद विधान केले, ज्यामुळे फिर्यादीला लज्जा व प्रतिष्ठेची हानी झाली, असे तक्रारीत नमूद आहे.
प्रकरणाची सविस्तर हकिकत: तक्रारीनुसार, दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी, संध्याकाळी 8:30 वाजता, शहरान बँक्वेट हॉल, रुबी हॉस्पिटलच्या बाजूला, टागोर नगर, विक्रोळी येथे सभा चालू असताना, आरोपीने हिंदीत असे विधान केले की, "इलेक्शन जब चालू हुआ, तब मै भी देख रहा था, कौन मेरे सामने खडा होने वाला है, टक्कर बी वैशी होनी चाहिये ना, लेकिन कोई मेरे सामने आने की हिम्मत ही कर रहा था, सब पीछे सब पीछे, जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले में डाल दी, अभी 20 तारीख को काटेंगे बकरी को."
या वक्तव्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असून, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रोळी पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.