महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करणार- सतेज पाटील

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Nov 06, 2024

मधुरिमाराजे ऐनवेळी उमेदवारी माघार घेतल्याने सतेज पाटील झाले भावूक ,अश्रू अनावर

कोल्हापूर| विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी उमेदवारी माघार घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे पाटील भावूक होतबोलताना त्यांचे अश्रू अनावर झाले.

सतेज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर या निर्णयाबद्दल बोलताना, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काहीही माहिती नव्हतं," असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की माघार घेण्यापूर्वी त्यांना फक्त काही मिनिटांपूर्वीच या निर्णयाची माहिती मिळाली होती. त्यांचा प्रयत्न असूनही मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने पाटील अस्वस्थ झाले.

या घटनेनंतर सतेज पाटील म्हणाले, "पद, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा मला कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. मला या प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य द्या," असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.


कोल्हापूरच्या निवडणुकीवर काय म्हणाले?

 शिरोळमध्ये वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. उत्तर, दक्षिण मध्येही वंचितची उमेदवारी मागे घेतली आहे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे माघार घेतली आहे. मी कुणावरही वक्तव्य करणार नाही. मला पुढचे 15 दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवर केला. त्याला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करणार आहे. महाराष्ट्राची जनता पुतळा कोसळला ते विसरणार नाही.बदलापूर मध्ये काय झालं ते विसणार नाही, पुण्यातील हीट अॅंण्ड रन विसरणार नाही. 23 तारखेनंतर त्यांना गायब करतील. महाडिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत उलटा प्रचार का केला? संजय मंडलीक जे बोलले त्याला ते काही बोलले का? निवडणुका म्हटल्यानंतर हे घडणारच आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.