
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई।ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांना आगामी राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यांना ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.
भाजप आमदारांची मुख्यमंत्रिपदासाठी मागणी
भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाकडे मागणी केली आहे. पाच वर्षांसाठी हे पद भाजपकडे असावे, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
सागर बंगल्यावर भाजप आमदारांची हालचाल
मुंबईतील सागर बंगल्यावर भाजप आमदारांची भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. येत्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.
राजकीय हालचालींना वेग
मंत्रिमंडळ विस्तार आणि सत्तावाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळातील सहभाग ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.राजकीय वर्तुळातील या घडामोडींवर सर्वांचेल क्ष लागले आहे.