
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
योगेश चव्हाण
नवी मुंबई हे शहर उच्चारताच एका नावाची आठवण होते, ती म्हणजे आदरणीय श्री.गणेश नाईक. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या शहराच्या विकासाचे नेतृत्व करणारे गणेश नाईक हे नवी मुंबईसाठी केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नाही, तर त्याच्या उभारणीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नवी मुंबईने देशातील पहिले नियोजनबद्ध शहर म्हणून लौकिक मिळवला आहे.
गणेश नाईक: सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेता
गणेश नाईक यांचा प्रवास साध्या सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यापासून दमदार राजकीय नेत्यापर्यंतचा आहे. ठाणे जिल्ह्यातील खैरणे-बोनकोडे या छोट्या गावात १५ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेल्या नाईक यांना बालपणापासूनच समाजकार्याची आवड होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. जिद्द, प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
राजकीय वाटचाल आणि यश
गणेश नाईक यांनी कामगार चळवळी पासून आपली सुरुवात केली व पुढे शिवसेना पक्षातून राजकीय वाटचाल सुरू होऊन विद्यमान केबिनेट मंत्री झाले . पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते विविध मंत्रिपदांवर कार्यरत राहिले. त्यांनी वनमंत्री, पर्यावरण मंत्री, कामगार मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि नवी मुंबई भागाचा सर्वांगीण विकास साधला गेला.
नवी मुंबईतील ठळक योगदान
1. पायाभूत सुविधा:
मोरबे धरण प्रकल्पाने नवी मुंबईला दीर्घकालीन पाणीपुरवठा सुनिश्चित केला.
पाम बीच रोडच्या निर्मितीमुळे शहराचा सौंदर्य आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाली.
२०० हून अधिक उद्यानांची उभारणी करून नवी मुंबईला ‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळख मिळवून दिली.
2. सामाजिक आणि कामगार कल्याण:
कंत्राटी कामगारांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय.
श्रमिक संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देणे.
मोफत रुग्णवाहिकांचे वाटप करून आरोग्य सेवेसाठी योगदान.
3. शैक्षणिक प्रगती:
विद्यार्थ्यांसाठी एसएससी सराव परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन.
4. पर्यावरण संवर्धन:
मलनिस्सारणासाठी अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानाचा वापर.
हिरवाई संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांमुळे नवी मुंबईला स्वच्छ शहर म्हणून मान्यता.
5. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान:
दरवर्षी मिनी ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शहराचे सांस्कृतिक वातावरण समृद्ध करणे.
नवी मुंबईचा चौफेर विकास
गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईने झपाट्याने प्रगती केली आहे. पायाभूत सुविधा, शैक्षणिक प्रकल्प, पर्यावरणीय उपक्रम आणि नागरी सेवांच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईला देशातील सर्वांत प्रगत शहरांपैकी एक बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पुढील ५० वर्षांचा विचार करून शाश्वत विकासाची पायाभरणी करण्यात आली आहे.
‘चिरतरुण योद्धा’
७४ वर्षांच्या वयातही गणेश नाईक यांची ऊर्जा आणि विकासाची तळमळ थक्क करणारी आहे. आजही ते नवी मुंबईतील जनतेच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नवी मुंबईचा विकास हा एक आदर्श मॉडेल बनला आहे. कोरोना सारख्या महामारीत अनेक नेते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी ओळखून शंभरहुन अधिक वेळा महानगर पालिका आयुक्त यांना वेळोवेळी सूचना मार्गदर्शन करणारा एकमेव नेता म्हणजे आदरणीय श्री गणेश नाईक.
नवी मुंबईसाठी नवी स्वप्ने
आदरणीय श्री गणेश नाईक यांच्या भविष्यातील व्हिजनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, मल्टिलेव्हल पार्किंग, सोलर पार्क, शाळांचे आधुनिकीकरण, घाऊक बाजारांचे पुनर्बांधणी आणि नवी मुंबईचे डिजिटल परिवर्तन यांसारखे अनेक प्रकल्प आहेत.
नवी मुंबईचा शिल्पकार
आदरणीय श्री.गणेश नाईक यांचे जीवन हे जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबईने जागतिक स्तरावर ओळख मिळवली आहे. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना लोकनेता,‘विकास पुरुष’, ‘शिल्पकार’, आणि ‘चिरतरुण योद्धा’ या पदव्या प्राप्त झाल्या आहेत.
आदरणीय श्री.गणेश नाईक यांची ही कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी असून, नवी मुंबईच्या विकासाचा गौरवशाली इतिहास त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे.