दिवा बदलापूर-२ : सीसीटीव्हीने केला प्रकार उघड

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Dec 04, 2024

शाळा व्यवस्थापनाने दोन दिवस ठेवले प्रकरण दडपून

दिवा, मुंब्रा:बदलापूर प्रकरण ताजे असताना आता दिवा येथे बदलापूर-२ समारो आली आहे .दिवा परिसरात एका विद्यार्थिनीसोबत घडलेल्या घटनेचा उलगडा सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला आहे. शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण तब्बल दोन दिवस दडपून ठेवले होते. या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे.बुधवारी सायंकाळी पालकांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

दिवा शहरात एक इंग्रजी माध्यमाशी शाळा आहे. या शाळेच्या वर्गात मंगळवारी एक दहा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थींनी वर्गात आली. वर्गात कोणी नव्हते. मुलगी वर्गात येताच तिच्या मागे एक तरुण आला. त्याने इकडे तिकडे पाहून मुलगी एकटी वर्गात आहे. त्यानंतर त्याने अश्लील चाळे सुरु करुन मुलीला हात लावला. मुलीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर तो तरुण त्याठिकाणाहून पसार झाला. मुलीसोबत घडलेला प्रकार मुलीच्या मैत्रिणीच्या आईने मुलीच्या आईला सांगितला. मुलीने आईला हा प्रकार ऐकताच धक्का बसला. मुलीसोबत नातेवाईकांनी मुंब्रा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. प्रश्न असा आहे की, शाळेची काय जबाबदारी आहे. एका वर्गात शाळेत बाहेरचा व्यक्ती प्रवेश करतो. त्या मुलीसोबत गैरकृत्य करतो. याचा थांग पत्ता शाळेला लागत नाही. पोलिसानी आधी या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधात कारवाई केली नव्हती. मनसेचे पदाधिकारी प्रशांत गावडे यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. पोलिसांनी शाळेच्या संस्था चालकाच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. गावडे यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांना या प्रकरणी जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मनिष तिवारी हीला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी सापडलेला नाही. दिवा शहरात ६४ शाळा या बेकायदेशीर आहे. या शाळा शाळेतील अरुंद आणि दाट लोकवस्तीत गाळ्यामध्ये चालविल्या जातात. त्यामुळे या शाळा मुलींसाठी किती सुरक्षित आहेत असा सवाल या घटनेपश्चात उपस्थित केला जात आहे. या शाळेतील संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांचा निष्काळजीपणामुळे मुलींची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.