वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला मोठा झटका

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Dec 12, 2024

मुंबई:महाराष्ट्रात सत्तासमीकरणात मोठे बदल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदावरून हटवले आहे. या पदावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जात होते.मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव श्रीकर परदेशी यांनी अधिकृत पत्र जारी करून डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती जाहीर केली.डॉ. नाईक यांनी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा विभाग, आणि धर्मार्थ रुग्णालयांच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.ते भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची भूमिका:

गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी हा कक्ष 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला.या कक्षाने अनेक रुग्णांना मदत दिल्यामुळे सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    राजकीय परिणाम

या निर्णयामुळे भाजप-शिंदे युतीतील सत्तासंतुलन बदलत असल्याचे दिसून येते. शिंदे गटाच्या लोकांना पदांवरून हटवणे ही रणनीती भाजपची वाढती पकड दर्शवते.