
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
श्मशानभूमीत कुटुंबीयांची दोषींवर कारवाईची मागणी
नवी मुंबई।रबाळे येथील यादव नगरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या शॉकने एका लहान मुलाचा मृत्यू झाला. बालक गंभीर भाजल्यामुळे त्याला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिकांनी श्मशानभूमीत मृतदेह ठेवून जोरदार आंदोलन केले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मृत बालक अमन सैनी घराजवळ खेळत असताना अमन उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आला. शॉक लागून तो गंभीर भाजला. नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीय व स्थानिकांचा संताप
अमनच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिकांनी श्मशानभूमीत मृतदेह ठेवून आंदोलन केले. त्यांचा आरोप आहे की महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली. दोषींवर कठोर कारवाई व न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.महावितरणचे अधिकारी रत्नदीप काटके यांनी या घटनेवर भारत समाचार टीवी सी बोलताना स्पष्टीकरण देताना सांगितले की ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठेवण्यासाठी सभोवताल भिंत बांधण्यात आली होती.मात्र, काही असामाजिक तत्वांनी ती भिंत तोडली होती.भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.महावितरण पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देत आहे.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने प्रशासन व महावितरणच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमनच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात शोक आणि रोष पसरला आहे. आता प्रशासन दोषींवर कारवाई करून अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचेलक्ष आहे.