औरंगाबादमध्ये 21.59 कोटींचा घोटाळा

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Dec 24, 2024

सरकारी संगणक ऑपरेटरने सरकारी पैसे उडवले, आलिशान जीवनशैलीत केला खर्च

औरंगाबाद।औरंगाबाद येथे सरकारी खजिन्यातून तब्बल 21.59 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. हर्षल कुमार या संगणक ऑपरेटरने पदाचा गैरवापर करून सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला आणि स्वतःच्या आलिशान जीवनशैलीसाठी खर्च केला.

घोटाळ्याचे मुख्य आरोपी वर सरकारी तिजोरीतून 21.59 कोटी रुपये काढल्याचा आरोप.हर्षलने पैसे वैयक्तिक गरजा आणि महागड्या खरेदीसाठी वापरले.

पैसे खर्च गर्लफ्रेंडसाठी चार बेडरूमचा आलिशान फ्लॅट खरेदी साठी केले। मित्राला एक फ्लॅट गिफ्ट केला. 1.30 कोटींची BMW कार खरेदी. 32 लाखांची BMW बाईक खरेदी.सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.आरोपीच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर आहे.

     प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

या घोटाळ्यामुळे सरकारी खजिना आणि निधी व्यवस्थापनावरील प्रशासकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सरकारी तिजोरीतील निधीचा योग्य प्रकारे वापर आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची ग़रज आहे.