"सुशासन दिवस" निमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेंद्रे चौकात स्वच्छता उपक्रम

  • Admin
  • मुंबई
  • Dec 25, 2024

अतुल चेंडके

मुंबई। भारताचे यशस्वी पंतप्रधान, उत्कृष्ट वक्ते, भारतरत्न "स्व. अटलबिहारी वाजपेयी" यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कुर्ला विधानसभेतील वॉर्ड क्र. 151 अध्यक्ष नित्यगजेंद्र नाडार यांच्या पुढाकाराने "सुशासन दिवस" साजरा करण्यात आला.

या निमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेंद्रे चौकातील इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांच्या स्मारकाची स्वच्छता करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि स्वच्छतेच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला.

शाश्वत विकास आणि सामाजिक जबाबदारी यासाठी असे उपक्रम प्रेरणादायीठरत आहेत.