टॉरेस ज्वेलरी घोटाळा: मालक फरार, गुंतवणूकदारांची फसवणूक

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 06, 2025

नवी मुंबई। तुर्भे के मैफ्को येथील टॉरेस ज्वेलरी कंपनीच्या कार्यालयाबाहेर शेकडो गुंतवणूकदारांनी ठिय्या दिला आहे. कंपनीने दिलेल्या वचनांनुसार पैसे परत न दिल्यामुळे गुंतवणूकदार संतप्त झाले असून त्यांनी आपली मूळ रक्कम परत देण्याची मागणी केली आहे.


अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विविध योजनेत लाखो रुपये गुंतवले होते. सुरुवातीला ठरलेल्या वेळेत पैसे परत मिळत होते, परंतु डिसेंबरनंतर दोन आठवड्यांपासून पैसे देणे थांबले आहे.

मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी कंपनीच्या कार्यालयासमोर सुरक्षा तैनात केली आहे. मात्र, कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.


कंपनीचा मालक सध्या परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अधिक गोंधळ आणि चिंता निर्माण झाली आहे.

कंपनीने १०% साप्ताहिक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गोळा केली होती. अशा प्रकारच्या अवास्तव वचनांमुळे फसवणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

गुंतवणूकदारांनी स्पष्ट केले आहे की, "आम्हाला व्याज नको, फक्त आमची मूळ रक्कम परत मिळावी." नागरिकांनी कंपनीवर करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याचे वृत्त आहे.