रिलायन्स ए गेट जवळ सांडपाण्याचा वापर करून गाड्या धुण्याचा व्यवसाय;अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 20, 2025

नवी मुंबई. घनसोली रिलायन्स ए गेट परिसरात सर्व्हिस रोड वर महानगरपालिकेने रस्त्यावरील वृक्ष संवर्धनासाठी सांडपाण्याचा साठा ठेवला आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी या सांडपाण्याचा गैरवापर करत अनधिकृतपणे गाड्या धुण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला असून राहादारी करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा आढावा भारत समाचार टीवी चे एडिटर इन चीफ श्री.योगेश चव्हाण यांनी घेतला आहे 

 बघू शकता कसा सांडपाण्याचा उपयोग करून कार वॉशिंग सेंटर सुरू आहे.चिखलामुळे शाळेच्या बसेस, रिक्षा, आणि प्रायव्हेट गाड्या धुत आहे.येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण.

महानगरपालिकेचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष ?

महानगरपालिकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, सांडपाण्याचा अशा प्रकारे वापर करू नये. तरीही काही गाडी चालक आणि व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत खड्डे तयार केले आहेत.

नागरिकांची मागणी

नागरिकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रस्त्यावरील चिखल आणि अपघात आणि आरोग्य धोक्यांपासून सुटका होईल.महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई केली, तरच या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघेल आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित होईल.