
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।सिद्धार्थ विशाल उघडे या सहा वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. या प्रकरणात नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाईची पहिली पावले उचलली असून वाशीचे सहाय्यक उद्यान अधिकारी प्रशांत उरणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि, यामुळेच ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर वाढलेल्या दबावामुळे त्यांची झोप उडाल्याचे दिसत आहे.
२ नोव्हेंबर २०२४ रोजी वाशी सेक्टर १४ मधील गोरक्षनाथ पालवे उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून सिद्धार्थचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एक महिन्याहून अधिक काळ लोटूनही संबंधित ठेकेदार व महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सिद्धार्थचे पालक विशाल उघडे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती.प्रारंभिक कारवाई: सहाय्यक उद्यान अधिकारी प्रशांत उरणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. सिद्धार्थचे वडील विशाल उघडे यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिकेने आपली जबाबदारी स्वीकारून पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी व भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.