रा. फ. नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रचला अनोखा विश्वविक्रम

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 26, 2025

नवी मुंबई.रा. फ. नाईक विद्यालयात अथांग इन्स्टिट्यूट ऑफ योग व रा. फ. नाईक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 1600 विद्यार्थ्यांनी "विर भद्रासन योग"साकारला आहे.या दरम्यान माजी आमदार संदीप नाईक, संदीप डोंगरे आणि अनुजा अय्यंगार उपस्थित होते . या दरम्यान रा. फ. नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित करत "वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ भारत" मध्ये आपले नाव कोरले आहे.

या उपक्रमामध्ये 1600 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "विर भद्रासन योग" सादर केला. हा विक्रम जगातील पहिला असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा विशेष अभिमानाचा क्षण ठरला आहे.या अनोख्या उपक्रमासाठी संदीप डोंगरे व अनुजा अय्यंगार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी प्रयत्नांबद्दल विद्यार्थ्यांसह अथांग इन्स्टिट्यूट ऑफ योगचेही विशेष कौतुक केले जात आहे.

माजी आमदार संदीप नाईक यांनी रा. फ. नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रचलेला हा इतिहास अत्यंत गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी त्यांचे आणि संपूर्ण आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले .