माघी गणेशोत्सवाची धूम; भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 03, 2025

नवी मुंबई: माघी गणेशोत्सवानिमित्त केसरी प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईत भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथील रांजण देवी ग्राउंडमध्ये श्री गणेशाची भव्य प्रतिकृती स्थापित करण्यात आली. या उत्सवाची माहिती ठाणे महोत्सवाचे आयोजक शिरीष प्रभाकर पाटील यांनी दिली.

शनिवारी सकाळी ९ वाजता श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. संध्याकाळी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवात महाआरोग्य शिबिर, भजन-कीर्तन, तसेच ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक केशव अंकल म्हात्रे, पश्चिम महाराष्ट्र एकता मंच अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलाकार उपस्थित होते.धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा संगम असलेला हा महोत्सव नवी मुंबईतील संस्कृतीला नवचैतन्य देणारा ठरत आहे.