
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी एकाच मार्गावरून प्रवास करत होते. आरोपी स्कूटीवर होता, तर पीडित बाईकवर जात होता. पीडिताने आरोपीला ओव्हरटेक केले, यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि सिग्नलजवळ अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने स्वतःच्या हेल्मेटने पीडिताच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डोक्यात रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉटिंग) झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलीसांनी सदर प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.