कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Feb 15, 2025

मुंबई. नवी मुंबई महानगरपालिका व परिवहन सेवेमधील आस्थापनेवर कार्यरत कर्मचारी, ठोक मानधन कर्मचारी, नॉन-कोविड कर्मचारी, शिक्षक, वाहक, चालक तसेच ठेकेदार मार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी "समान काम, समान वेतन" लागू करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार असून, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीचे नेतृत्व श्रमिक सेना संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार संजीव नाईक करणार आहेत.या बैठकीत महापालिका व परिवहन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे, यासाठी ठोस निर्णय अपेक्षित आहे. या बैठकीतील निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील कामगार संघटनांचे लक्ष लागले असून, यामध्ये श्रमिक सेना संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी होणार आहेत.असली माहिती श्रमिक सेना संघटने चे सरचिटणीस चरण जाधव , राम चव्हाण यांनी दिली आहे.