
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने करावे गाव, सीवुडस येथील ग्रामस्थांचा हिंदुराष्ट्र स्थापनेचा निर्धार !
नवी मुंबई - देशभरात बांगलादेशी घुसखोरांचा धोका हा वाढत असून नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत आश्रय दिला जाणार नाही अशी भूमिका घ्या तसेच बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन ठोस कृती करावी असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले, ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, करावे गाव, सीवुडस येथे रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणी साक्षीने हिंदुराष्ट्र स्थापनेचा निर्धार यावेळी येथील ग्रामस्थांनी केला.
*हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी म्हणाले*, 'हिंदू धर्मातील आचारधर्माचे पालन करून योग्य साधना केल्यास आनंदी जीवन जगता येईल. हिंदूंच्या विरोधात सुनियोजित षडयंत्र रचली जात असून लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्डाचा लँड जिहाद, बांगलादेशी घुसखोर असे विविध प्रकारचे आघात हिंदूंवर होत असताना हिंदूंनी एकत्र येत कृतिशील होऊन हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करूया !'
सभेचा प्रारंभ शंखनाद करून झाला. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याचा परिचय समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी केला. या सभेत धर्मप्रेमी श्री. अनंत सातपुते यांनी येथील स्थानिक अनधिकृत 'पीरबली शहा दर्गा'च्या विश्वस्तांच्या विरोधात गेल्या १४ वर्षांपासून माहिती-अधिकाराचा अवलंब करत दिलेल्या न्यायालयीन लढ्याविषयी माहिती दिली. हिंदु राष्ट्राची शपथ ग्रहण करून आणि हिंदु राष्ट्राच्या जयघोषाने सभेची सांगता करण्यात आली.