
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
कोपरखैरणे। महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा दिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गर्जना मित्र मंडळ, कोपरखैरणे तर्फे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री "पाळणा बाळ छत्रपती शिवरायांचा" या विशेष कार्यक्रमाने सुरू होणार आहे. तर बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी शिवज्योत आगमन, अभिषेक व प्रतिमा पूजन, तसेच सायंकाळी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानंतर रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात ह.भ.प. चैतन्य महाराज पाडळे यांचे प्रेरणादायी प्रवचन होणार असून, गर्जना मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.गर्जना मित्र मंडळाचे आयोजक व निमंत्रक शक्ती कमलाकर म्हात्रे यांनी सर्व शिवभक्तांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- प्रतिनिधी,
कोपरखैरणे