घणसोलीत महिलेला घरात घुसून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 22, 2025

 नवी मुंबई। घणसोलीमध्ये घरात घुसून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनिता धर्मा चव्हाण (38 वर्षे) या महिलेवर हल्ला झाला असून, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मारहाणीमुळे पीडित महिलेच्या पाठीला व कमरेवर गंभीर मार बसला असून, तिच्या लहान मुलालाही जखमा झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अधिक तपास सुरू आहे.