
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई | नवी मुंबईतील पत्रकारांसाठी उभारलेले पत्रकार भवन आज दुर्लक्षित स्थितीत असून, वापराअभावी ते पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सिडकोने पत्रकारांसाठी हा प्रकल्प उभारला होता, मात्र आज तो धुळखात पडला आहे.
वापराअभावी होत आहे नासधूस
पत्रकार भवन हे पत्रकारांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असावे, असा हेतू होता. मात्र, योग्य देखभालीअभावी ते ढासळत आहे. स्थानिक पत्रकारांच्या मते, सिडकोच्या निष्काळजीपणामुळे या इमारतीचा योग्य वापर होत नाही, आणि त्यामुळे तेथील सोयीसुविधा वाया जात आहेत.
नवी मुंबईच्या पत्रकारांवर अन्याय?
सूत्रांच्या माहितीनुसार, हे पत्रकार भवन नवी मुंबईच्या पत्रकारांना न देता, मुंबईतील पत्रकारांना सुपूर्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा निर्णय नवी मुंबईतील पत्रकारांसाठी अन्यायकारक ठरेल.
नेत्याच्या इशाऱ्यावर सिडकोचा निर्णय?
सिडको एका राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन आपल्या फायद्यासाठी हे भवन अन्य गटाला देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पत्रकारांमध्ये नाराजी पसरली आहे, आणि त्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
न्याय आणि पारदर्शकतेची मागणी
स्थानिक पत्रकारांचा ठाम आग्रह आहे की, हे भवन नवी मुंबईच्या पत्रकारांसाठीच राखीव असावे. सिडकोने या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी आणि पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.