
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई | कोपरखैरणे येथील सिडको कार्यालयात काही एजंटांकडून नेते व संघटनांच्या नावाने धमक्या देऊन दबाव टाकला जात आहे. यामुळे त्रस्त होऊन सिडको अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे शटर डाऊन करून कामकाज सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अधिकाऱ्यांना आता पोलिस संरक्षणात काम करावे लागण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे.
कोपरखैरणे येथील तीन टाकी जवळ, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यालयाच्या वर सिडकोचे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत सिडकोच्या घरांच्या ट्रान्सफर तसेच इतर संबंधित कामकाज केले जाते. मात्र, अलीकडे काही स्थानिक एजंटांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे.हे एजंट नेत्यांच्या आणि संघटनांच्या नावाने धमक्या देऊन जबरदस्तीने आपले काम करवून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून कार्यालयाचे शटर डाऊन करून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य नागरिकांचे नुकसान
या प्रकारामुळे सामान्य नागरिकांनाही सिडकोच्या कामांसाठी अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. एजंटांच्या या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पोलिस संरक्षणाची मागणी:
सूत्रांच्या माहितीनुसार, या धमक्या देणाऱ्या एजंटांपासून सुटका मिळवण्यासाठी सिडको अधिकारी लवकरच पोलिस संरक्षणाची मागणी करणार आहेत. यामुळे या प्रकारांना आवर घालता येईल अशी अपेक्षा आहे.या घटनेवर प्रशासनाने त्वरीत कारवाई करणे गरजेचे आहे. धमक्या देणाऱ्या एजंटांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.