कर्णकर्कश सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांचा बुलडोझर

  • Admin
  • नवी मुंबई
  • Mar 04, 2025

अरुण गुप्ता 

नवी मुंबई| कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाशी वाहतूक पोलिसांनी ( Vashi traffic police )  कठोर कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत ६९ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, लवकरच ते नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली.

???? ६९ वाहनांवर कारवाई – नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून ₹६९,००० दंड वसूल

???? विशेष मोहीम – दिवस आणि रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष
???? महागड्या गाड्यांवरही कारवाई – दोन गाड्यांमध्ये अनधिकृत बदल आढळल्याने मोटार परिवहन विभागाच्या मदतीने कठोर कारवाई


पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार आणि सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. जेष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

वाहतूक पोलिसांनी यापुढेही अशा नियम तोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.