
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
ठाणे | पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले महाराष्ट्रातील सुबोध पाटील यांनी या भयावह घटनेचे थरारक अनुभव कथन केले. "दहशतवाद्यांनी विचारलं, 'हिंदू कोण आहेत तुमच्यात? उभे रहा!' आणि मग थेट गोळीबार सुरू केला," अशी अंगावर काटा आणणारी आठवण त्यांनी माध्यमांसमोर सांगितली.
सुबोध पाटील म्हणाले की, "आम्ही मागून काही आवाज ऐकले, पण ओळखू शकलो नाही. नंतर लोक धावू लागले. आम्हालाही भीती वाटली आणि आम्ही धावू लागलो. थोडं पुढे गेल्यावर काही लोक बसले होते, आम्हीही त्यांच्या सोबत बसलो. तेवढ्यात एक दहशतवादी आला आणि म्हणाला, 'हिंदू कोण आहेत? उभे रहा!' आणि लगेच गोळीबार सुरू झाला. मी गोळी लागून बेशुद्ध पडलो."
एका स्थानिकाने वाचवले प्राण
पाटील पुढे म्हणाले, "एका स्थानिक व्यक्तीने मला ओळखले. त्याने मला पाणी दिलं, आणि आपल्या पाठीवर उचलून एक्सिट पॉईंटकडे नेलं. नंतर बाईकवरून मला खाली आणलं. सैन्याच्या जवानांनी मला प्रथमोपचार दिले आणि हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात दाखल केले. तिथे मी सात दिवस भरती होतो."