
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई | डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ येथे शनिवार, ३ मे रोजी होणाऱ्या ए. आर. रहमान यांच्या प्रत्यक्ष लाइव्ह कॉन्सर्ट निमित्त नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दुपारी २ ते मध्यरात्र १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या हालचाली व पार्किंगवर बंदी लागू केली आहे.
ही वाहतूक मर्यादा नवी मुंबई शहरातील संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडीचा विचार करून तुर्भे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालानंतर लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत जारी केले आहेत.
कोणत्या वाहनांना सूट?
या बंदीमध्ये अत्यावश्यक सेवांचे वाहन, जसे की पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, तसेच शासकीय वाहने व आयोजकांनी जारी केलेल्या अधिकृत पासधारक वाहने यांना सूट देण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी आवाहन:
पोलीस प्रशासनाने वाहनचालक व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शनिवारच्या दिवशी प्रवास करताना योग्य नियोजन करून गरज नसल्यास जड वाहने शहरात आणू नयेत, असे स्पष्ट केले आहे.