
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने 'केवायसी' प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकराशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरही मालमत्ताकर बिल पाहता येणार आहे तसेच त्याचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेशी संबंधित विविध माहिती जसे की, महत्त्वाच्या सूचना, पाणीपुरवठा, अतिवृष्टीचा इशारा, वाहतूक कोंडी या संबंधीचे इमर्जन्सी अलर्ट त्वरित मिळू शकतील.
मालमत्ताकर विभागाच्या डिजिटल सेवेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ‘केवायसी - आपले ग्राहक ओळखा’ (Know Your Customer – KYC) ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन QR CODE स्कॅन करून किंवा संबंधित लिंकवर क्लिक करून KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल.
मालमत्तेला KYC जोडताना मालमत्ता धारकाचा मालमत्ता क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी तपशील भरावे लागतील. ही माहिती पूर्ण आणि अचूक भरल्यानंतर संबंधित खात्यातून SMS व Email द्वारे मालमत्ताकराची बिले, करभरणा करण्यासाठी लिंक तसेच संबंधित विभागाचे अपडेट्स मिळतील.
त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ताकर बिले ऑनलाईन मिळवावीत आणि मालमत्ताकर वेळेत भरणा करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.