वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथे जनता दरबाराचे आयोजन

ठाणे. वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार, दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

     नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात तीन प्रतीत सादर करावीत. नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत.

      यापूर्वी झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. दि. 19 मे रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.