पहिली दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज अंधारात!
- Admin
- महाराष्ट्र
- Oct 19, 2025
नेरुळमधील शिवप्रेमींनी व्यक्त केली तीव्र नाराजी
नवी मुंबई : दिवाळीच्या पहिल्या दिवशी नेरुळ सेक्टर १ येथील एसआयएस कॉलेजसमोर असलेल्या शिवाजी चौकात अंधाराचे साम्राज्य पाहून स्थानिक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. नागरिकांनी पुढाकार घेत चौकात पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लावला.