Breaking सायन-पनवेल महामार्गाजवळ खाडीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

  • Admin
  • नवी मुंबई
  • Oct 22, 2025

घटनास्थळी पोलिस दाखल 

अरुण गुप्ता

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर कलंबोलीजवळ बुधवारी सायंकाळी खाडीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार लक्षात घेताच पोलिसांना माहिती दिली.

कलंबोली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. बातमी लिहीपर्यंत पोलिसांनी पंचनामा सुरू केला होता व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. कलंबोली पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.