मोबाईल चोरीच्या संशय वरुण माजी नगरसेवका कडून युवकाची हत्या

  • Admin
  • नवी मुंबई
  • Nov 07, 2025

माजी नगरसेवक अर्जुन अडागळे सहित दोघे अटक

तुर्भे स्टोअर येथील हत्या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई  ।तुर्भे स्टोअर च्या केके आर रोड मध्ये गुरुवार सकाळी नवजीवन हायस्कूलच्या गेटजवळील बाथरूममध्ये सुधाकर पाटोळे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दारूची रिकामी बाटली व काही संशयास्पद साहित्य आढळून आले असून, हत्या झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडागळे सोबत दोघांना अटक केले आहे.

तक्रारी अनुसार गुरुवारी सकाळी अर्जुन अडागेल यांनी सुधाकर पाटोळे याचे घरी गेले आणि त्याच्या वर मोबाईल चोरी चा आरोप करत घरातून शौचालय जवळ आणले .तिथे अर्जुन अडागळे यांनी त्याच्या सोबत मारहाण केले,ह्या मारहाणीत तो मयत झाला.अर्जुन नी त्याला.तिथे सोडून निघून गेला,याची माहिती पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोचून शव ताब्यात घेऊन वाशी मनपा हॉस्पिटल मध्ये पाठवले,ह्या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन अडागळे आणि.एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून अटक केले आहे. ह्या घटने नंतर तिथले शाळेचे सुरक्षा संबंधित प्रश्न निर्माण झाले आहे.कारण विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचारी यांची ये-जा या बाथरूमच्या मार्गाने होत असल्याने शाळेच्या परिसरातही भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीरपणे उपस्थित झाला आहे.

या हत्येने तुर्भे स्टोअर परिसर हादरला असून, लवकरात लवकर या प्रकरणाचा खुलासा व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.