गेली २५ वर्षे नवी मुंबईकरांचा विश्वास; यावेळेलाही भाजपाचाच महापौर बसेल – वनमंत्री गणेश नाईक

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 06, 2026

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई शहरातील जनतेने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवला असून, मी ज्या पक्षात काम केले त्या प्रत्येक वेळी त्या पक्षाचा महापौर नवी मुंबई महानगरपालिकेत बसला आहे. त्यामुळे यावेळेलाही भाजपाचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीस अवघे ९ दिवस शिल्लक असल्याने गणेश नाईक यांनी प्रचाराला जोर दिला आहे. प्रचार रॅली, पदयात्रा तसेच विविध भागांत जाहीर सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत लढत होत असली, तरी नवी मुंबईत भाजपाच नंबर वन पक्ष ठरेल, असा दावा नाईक यांनी केला.गणेश नाईक यांनी म्हणाले की नवी मुंबईकरांनी गेली २५ वर्षे माझ्यावर विश्वास ठेवला आहे. यावेळेलाही भाजपाचाच महापौर बसेल, याबाबत मला पूर्ण खात्री आहे.