मुंबई एयरपोर्ट पर बड़ा हादसा टला
- Feb 04, 2026
66 नगरसेवकांची कोकण भवन येथे नोंदणी
नवी मुंबई ।नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता असतानाच नवी मुंबई भारतीय जनता पक्षाने गटनेत्यासह 66 नगरसेवकांची कोकण भवन येथे आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी नोंदणी केली आहे. या वेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाअध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, अभिजीत पेडणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल गेल्या शनिवारी जाहीर झाले. वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिकेत 65 नगरसेवकांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे पूर्ण बहुमत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपा पक्षाचा गटनेता म्हणून माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. कोकण भवन येथे 66 नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृत गट नोंदणी केली. 14 ड मधून निवडणून आलेले भरत भोईर या अपक्ष नगरसेवकाने देखील भाजपाला बिनशर्थ पाठिंबा दिल्याने भाजपाचे नवी मुंबई महापालिकेतील संख्याबळ 66 वर गेले आहे.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना डॉक्टर संजीव नाईक म्हणाले की, सर्वसमतीने सागर नाईक यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर महापौर कोण होणार याचा निर्णय होईल. भाजपचे नगरसेवक निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची येत्या पांच वर्षात पूर्तता करतील. नवी मुंबई शहराच्या विकासाला पुढे नेतील.
गटनेतेपदी निवडीवर प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी सहकारी नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्याना धन्यवाद दिले. महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास आणखी उंचीवर नेऊ, असे सांगितले. महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री नामदार गणेश नाईक व वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर होईल, अशी माहिती दिली. चौदा गावातील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी दिलेला पाठिंबा याबद्दल बोलताना चौदा गावांचा विकास नामदार गणेश नाईक यांच्याच नेतृत्वात होईल, असा विश्वास येथील जनतेला असल्याने भरत भोईर सोबत आल्याचे सांगितले.